बॉलिवूड विरुद्ध साऊथ वाद संपायचं काही नाव घेत नाही. साऊथमधील काही कलाकारमंडळींनी वादग्रस्त विधानं केली आणि या वादाला तोंड फुटलं. त्यानंतर बॉलिवूडमधील बरीच कलाकार मंडळी यावर आपलं मत मांडताना दिसत आहेत. बॉलिवूड आणि साऊथमध्ये काहीच फरक नसल्याचंही काही जणांनी स्पष्ट केलं आहे. आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही या वादावर आपलं मत स्पष्ट केलं आहे.

रोहित शेट्टीने अभिनेता रणवीर सिंगसह एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी रोहितला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवूडवर काही परिणाम होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, “बॉलिवूड आता संपलं आहे असा विचार जे लोक करतात त्यांना त्यामधून अधिक आनंद मिळतो. पण बॉलिवूड कधीच संपणार नाही. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील साऊथमधूनच आले आहेत. ओटीटी जेव्हा आलं तेव्हा देखील लोकांनी म्हटलं बॉलिवूड आता संपणार. ‘बॉलिवूड संपणार’ हे शब्दच ऐकून काही लोक खूश होतात.”

आणखी वाचा – VIDEO : …अन् पार्टीमध्ये बेधूंद होऊन नाचत राहिला शाहरुख खान, अभिनेत्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ चर्चेत

रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ८०-९०च्या दशकामधील नावाजलेल्या अभिनेत्री जया प्रदा आणि श्रीदेवी यादेखील साऊथमधूनच आल्या होत्या. जीतू जी यांच्या चित्रपटांचा जो काळ होता तेव्हा देखील ‘हिम्मतवाला’पासून ते ‘जस्टिस चौधरी’ चित्रपटापर्यंत साऊथचेच चित्रपट होते.”

आणखी वाचा – VIDEO : “मन्नतमध्ये ११ ते १२ टिव्ही अन् त्याची किंमत…”, शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शेट्टीच्या मते बॉलिवूड किंवा साऊथमध्ये कोणताच वाद नाही. तसेच बॉलिवूड चित्रपट कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार. रोहितचा ‘सर्कस’ चित्रपट आता प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. शिवाय तो ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये देखील व्यस्त आहे. शिवाय त्याच्या आणखी काही चित्रपटांची तो लवकरच घोषणा करणार आहे.