दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. अगदीच कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. यावर मध्यप्रदेशमधील एका आयएएस अधिकाऱ्यानं ट्वीट करत विवेक अग्निहोत्रींना, ‘चित्रपटाच्या कमाईची रक्कम काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी दान का करत नाहीस?’ असा प्रश्न विचारला होता. यावर विवेक अग्निहोत्री यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

आयएएस नियाज खान यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर लिहिलं, ‘आतापर्यंत ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानं १५० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. अप्रतिम. लोकांनी काश्मिरी पंडितांच्या भावनांचा खूप आदर केला. मी या चित्रपटाच्या निर्मात्यांना सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की, या चित्रपटाची संपूर्ण कमाई काश्मिरी पंडितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना काश्मीरमध्ये घर घेण्याच्या खर्चासाठी द्यावी. हे एक मोठं दान असेल.’

आणखी वाचा- “काही वेळा सत्य फारच…”, ‘द कश्मीर फाइल्स’वर अजय देवगणची पहिली प्रतिक्रिया

नियाज खान यांच्या ट्वीटला उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘सर नियाज खान साहेब, मी २५ तारीखला भोपाळला येत आहे. कृपया मला तुमच्या भेटीसाठी वेळ द्या. जेणेकरून आपण भेटून या विषयावर सविस्तर बोलू. त्यांना कशी मदत करता येईल आणि तुमच्या पुस्तकाची रॉयल्टी आणि आयएएस पॉवरची यासाठी कशी मदत होईल हे ठरवता येईल.’

आणखी वाचा- The Kashmir Files वर अखेर आमिर खाननं सोडलं मौन, म्हणाला “जेव्हा एका व्यक्तीवर अत्याचार…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र यावर विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.