आमिर खानचा चर्चेत असलेला लाल सिंग चड्ढा हा चित्रपट गुरुवारी (११ ऑगस्ट) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाबाबत लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉयकॉट लाल सिंग चड्ढा या ट्रेंडचा आमिर खानला चांगलाच फटका बसला. त्यामुळे गेल्या १० वर्षातला आमिरचा हा सर्वात कमी कमाई करणारा चित्रपट असल्याचे बोललं जात आहे. या चित्रपटावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. नुकतंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी अप्रत्यक्षपणे आमिर खानवर टीका केली आहे.

आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे अनेक समीक्षक तसेच कलाकार यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काहींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर काहीजण या चित्रपटावर टीका करताना दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा परिणाम पाहायला मिळत आहे. नुकतंच विवेक अग्रिहोत्रींनी याबाबत ट्वीट करत भाष्य केले आहे.

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

“आपल्याच अर्थव्यवस्थेचं नुकसान आणि…” ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंडबाबत अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूडमधील खान मंडळींवर आणि घराणेशाहीवर टीका केली आहे. यात ते म्हणाले, हा चित्रपट कसा आहे ते सोडून द्या. पण जेव्हा एक ६० वर्षीय अभिनेता अजूनही २० किंवा ३० वर्षीय तरुण अभिनेत्रींसोबत रोमान्स करण्यासाठी उत्सुक असतो आणि तरुण दिसण्यासाठी तो विविध तंत्रज्ञानाची मदत घेत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बॉलिवूड हे अजूनही चुकीच्या वाटेवर चालत आहे. त्यामुळेच सध्या बॉलिवूडची ही अवस्था झाली आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. तर कित्येकांनी त्यांचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे याआधीही आमिर खान या चित्रपटाला बॉयकॉट करु नका, कारण यामागे कित्येक लोकांची मेहनत असते असे म्हटले होते. त्यावरही विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर आणि सिनेसृष्टीवर टीका केली होती.

अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “चित्रपटाचा पूर्वार्ध हसवतो, पण नंतर…”

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.