छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध आणि बहुचर्चित जोडी दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियाची प्रेमकथा एखाद्या परिकथेप्रमाणे आहे असे म्हणावे लागेल. दिव्यांका आणि विवेकच्या शाही लग्नसोहळ्याची सर्व स्तरावर बरीच चर्चा झाली होती. इंदूर येथे दिव्यांका आणि विवेकचा शाही लग्नसोहळा पार पडलेला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासाठी चंदीगढमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते.

आपल्या लग्नसोहळ्याची प्रत्येक झलक दिव्यांकाने चाहत्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवली होती. मेहंदी, संगीत, हळद, लग्न आणि रिसेप्शनचे व्हिडिओ आणि फोटोंना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र दिव्यांकाच्या पाठवणीची झलक मात्र अद्याप चाहत्यांसमोर आली नव्हती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ तिने नुकताच शेअर केला आहे.

वाचा : लग्नावरून का उडाला सलमानचा विश्वास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाठवणीच्या क्षणाची आठवण दिव्यांकाला पावसावरून आली. जोरदार पाऊस आणि पाणी साचल्याने घरापर्यंत पोहोचू न शकल्याने विमानतळावरच दिव्यांकाची पाठवण करण्यात आली. हीच आठवण चाहत्यांसोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत कॅप्शनमध्ये दिव्यांकाने लिहिलं की, ‘विवेक तुला आठवतंय का? त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. माझ्या घरून पाठवण व्हावी अशी माझी इच्छा होती मात्र पाऊस आणि पाणी साचल्याने आपण घरापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे विमानतळावरूनच माझी पाठवण करण्यात आली. तरीही हा एक अनोखा आणि फिल्मी अनुभव होता. कोणीच त्यादिवशी रडले नाही. सगळेच आनंदी होते. तुम्ही जसा विचार करता किंवा जशी योजना करता त्याप्रमाणेच नेहमी घटना घडत असतात असे नाही, मात्र त्यापेक्षाही समृद्ध आणि सुंदर अनुभव तुम्हाला आयुष्य देऊन जातं.’