‘दिया और बाती हम फेम’ संध्या बहू म्हणजेच अभिनेत्री दीपिका सिंगने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान दीपिकाने बाळाला जन्म दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपिकाचा पती रोहित राज गोएलने त्यांच्या पहिल्याच बाळाच्या आगमनाची बातमी दिली. तो म्हणाला की, आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. आमचा आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सध्या दीपिकाला आराम करण्याची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या गोड बातमीनंतर नक्कीच दीपिकाच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीच्या बाळाचे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली असेल.

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने गरोदरपणाबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ती म्हणालेली की, मी सुट्टीसाठी बाहेरगावी गेले होते तेव्हा मी आजारी पडले. तेथून परतल्यानंतर लगेच मी डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला या गोड बातमीबद्दल सांगितले. माझे आई-वडील, सासू-सासरे आणि नवरा हे यामुळे खूप आनंदी आहेत. बाळाला जन्म देणं हा प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर अनुभव असतो. माझे कुटुंब काही गोष्टींमध्ये अंधश्रद्धाळू असल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस आम्ही ही बातमी कोणलाच सांगितली नाही. मी त्यांच्या भावना समजू शकते. रोहित आणि मी आतुरतेने त्या क्षणाची वाट पाहत आहोत.

गेल्याच आठवड्यात मॉडेल आणि अभिनेत्री लिसा हेडननेदेखील बाळाला जन्म दिला. लिसा आणि डिनो लालवानी यांना पुत्ररत्न झाला आहे. त्यांनी मुलाचे नाव ‘झॅक’ असे ठेवले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diya aur baati hum fame deepika singh aka sandhya blessed with a baby boy
First published on: 22-05-2017 at 11:46 IST