‘शाली’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर
प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद आणि मोतीबिंदूच्या हजारो शस्त्रक्रिया करून आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले डॉ. तात्याराव लहाने रुपेरी पडद्यावर स्वत:च्याच म्हणजे ‘डॉ. तात्याराव लहाने’ या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
डॉक्टरी हा व्यवसाय नसून सामाजिक सेवेचे व्रत असल्याचे डॉ. लहाने मानतात आणि त्याच दृष्टीने डॉ. लहाने हे सतत प्रयत्नशील असतात. आगामी ‘शाली’ या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने हे आपल्या स्वत:च्याच भूमिकेत काम करत आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत शंकर पाटील यांच्या ‘शाली’ या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे संवाद लेखन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल साटम यांनी डॉ. लहाने यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची कल्पना दिली आणि भूमिकेविषयी विचारणा केली. डॉ. लहाने यानीही साटम यांना होकार दिला आणि चित्रपटातील भूमिका स्वीकारली.
‘शाली’ हा चित्रपट कोकणातील वातावरण, परंपरा, लोककला यांचे दर्शन घडविण्यात आले आहे. चित्रपटातील गाणी रूपकुमार राठोड, बेला शेंडे आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी गायली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2015 रोजी प्रकाशित
डॉ. तात्याराव लहाने स्वत:च्याच भूमिकेत
‘शाली’ हा चित्रपट कोकणातील वातावरण, परंपरा, लोककला यांचे दर्शन घडविण्यात आले आहे.
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 24-11-2015 at 01:54 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr tatyarao lahane play role in shali