पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते मद्यधुंद अवस्थेत असून दिवंगत काका नुसरत फतेह अली खान यांच्या मॅनेजरला नुसरत फतेह अली खान म्हणत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहत यांच्यावर नेटकरी टीका करत आहेत.

ट्विटरवर शेअर होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहत त्यांचे काका नुसरत फतेह अली खान यांच्या मॅनेजरच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असल्याचे दिसत आहे. मग तो मॅनेजरला मिठी मारून म्हणतो, “आम्ही एक आहोत आणि नेहमी एकच राहू. ये मेरी जान है नुसरत फतेह अली खान.”

पाहा व्हिडीओ –

प्रसिद्ध गायकाने त्यांचे काका आणि दिवंगत लोकप्रिय गायक नुसरत फतेह अली खान यांची अशी खिल्ली उडवणे नेटिझन्सना पसंत पडले नाही. अनेक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट करत संताप व्यक्त केला आहे. तो मॅनेजरला दिग्गज गायकांच्या नावाने हाक कशी मारू शकतो, असं काही युजर म्हणाले. तर, काही जणांनी नुसरत फतेह अली खान यांच्या मॅनेजरवर प्रेम दाखवल्याबद्दल राहत अली खान यांचे कौतुकही करत आहेत. मात्र, याबाबत त्यांच्याकडून अद्याप या व्हायरल व्हिडीओवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

“मला पुरुषाची गरज नाही” म्हणत ‘या’ अभिनेत्रीने स्वतःशीच केलं लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहत यांनी १६ ऑगस्ट रोजी त्यांचे काका उस्ताद नुसरत फतेह अली खान यांना त्यांच्या २५व्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट शेअर करून श्रद्धांजली वाहिली होती. पोस्टमध्ये राहत यांनी लिहिले होते की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात असंख्य लोकांची मनं जिंकली आणि तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही तुमच्या संगीतात आणि तुमच्या कौटुंबीक वारशामध्ये जिवंत आहात. तुमची कमतरता नेहमीच जाणवेल,’ असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.