बॉलिवूडच्या अभिनेत्री जितक्या आपल्या लूकसाठी, अभिनयासाठी ओळखल्या जातात. तितक्याच त्या आपल्या फिटनेसबाबत जागरूक असतात. मलायका अरोरा, क्रिती सॅनॉन, कतरीना कैफ या अभिनेत्री फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. कपूर खानदानाची बेबो अर्थात करीना कपूर जितकी कुटुंबाची काळजी घेते तितकेच फिटनेस लक्ष देत असते. नुकताच तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
करीना कपूर आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मन जिंकतेचं मात्र खासगी आयुष्यात ती आता दोन मुलांची आई आहे. ती कुटुंबाला कायमच प्राधान्य देत असते. पती मुलांबरोबरचे तिचे व्हिडीओ फोटो शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती करीना योगा मॅटवर योग करताना दिसत आहे बाजूलाच तिचा धाकटा लेक बसला आहे. तिने योगाला सुरवात करताच जेह तिच्यामध्ये येत आहे. आई आणि मुलाच्या बाँडिंगचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. सोशल मीडियावर लोक जेहच्या या मजेशीर व्हिडिओवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
करीनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकरी आता यावर कमेंट करू लागलेत एकाने लिहले आहे,” खूप चांगले बाँडिंग आहे आई मुलामध्ये,” दुसऱ्याने लिहले आहे की “जेह खूप क्यूट आहे.”
सैफ अली खान आणि करीना कपूर. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर दोघांचे प्रेम जुळले, याआधी त्यांनी एकत्र काम केले होते मात्र ‘टशन’ चित्रपटात त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्या दोघांनी २०१२ साली लग्न केले. २०१७ साली त्यांच्या पहिल्या मुलाचा म्हणजे तैमूरचा जन्म झाला तर २०१२ साली त्यांच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे जेहचा जन्म झाला आहे.