scorecardresearch

‘फाइंडिंग फॅनी’मध्ये वडिलांना पाहण्यास शाहिद उत्सुक

आगामी चित्रपट ‘हैदर’च्या प्रसिद्धीत व्यस्त असलेला बॉलीवूड अभिनेता शाहिद हा वडिल पंकज कपूर यांना ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये पाहण्यास फारचं आतुर झाला आहे.

आगामी चित्रपट ‘हैदर’च्या प्रसिद्धीत व्यस्त असलेला बॉलीवूड अभिनेता शाहिद हा वडिल पंकज कपूर यांना ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये पाहण्यास फारचं आतुर झाला आहे. या चित्रपटात त्याच्या वडिलांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू दिसून येणार असल्यामुळे तो त्यासाठी खूप उत्सुक आहे.
होमी अदाजानिया दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही भूमिका आहेत. “मी अजूनपर्यंत चित्रपट पाहिलेला नाही. केवळ त्याचे प्रोमो बघूनचं मी चित्रपट पाहण्यास उत्सुक झालो आहे. माझ्या वडिलांची एक वेगळीच बाजू यात पाहायला मिळतेयं. शर्टाची बटनं खुली, छोट्या पँट आणि ज्यापद्धतीने ते डिंपल कपाडिया यांच्याकडे बघतात ते मला खूपचं आवडले. ही माझ्या बाबांची दुसरी बाजू जी त्यांनी मला कधीच दाखविली नाही आणि आता ती मला बघायला मिळतेयं. मला वाटतं ते अप्रतिम आहे. खरं तरं, संपूर्ण चित्रपटचं मस्त आहे. बाबांना ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये पाहण्यास मी फारचं उत्सुक झालो आहे,” असे शाहिद म्हणाला.
‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-08-2014 at 02:41 IST

संबंधित बातम्या