Bharat Takhtani Net Worth : अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांनी लग्नाच्या १२ वर्षांनंतर म्हणजे २०२४ मध्ये घटस्फोट घेतला. आता वर्षभराने भरत तख्तानीने त्याच्या आयुष्यात आलेल्या नवीन तरुणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत भरत याने ‘तुझं माझ्या कुटुंबात स्वागत…’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सर्वत्र त्याच मिस्ट्री गर्लची चर्चा सुरू आहे.
ईशाचा एक्स पती भरत हा पुन्हा प्रेमात पडला असून सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत त्याने प्रेमाची कबुली दिली आहै. भरत तख्तानी हा बिझेनसमन आहे. ईशा आणि तिचा एक्स पती भरत यांच्यामध्ये कोण श्रीमंत आहे ते जाणून घेऊया?
भरत तख्तानीची एकूण संपत्ती किती आहे?
मुंबईतील एक व्यावसायिक आणि एका प्रतिष्ठित सिंधी कुटुंबातील भरत तख्तानीने २९ जून २०१२ रोजी मुंबईतील इस्कॉन मंदिरात एका साध्या समारंभात ईशा देओलशी लग्न केले. आता हे जोडपे वेगळे झाले आहे. भरत तख्तानी हा १९५० मध्ये स्थापन झालेल्या जार ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे आणि आरजी बँगल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापन देखील करतो. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ईशा देओलचा एक्स पती भरत तख्तानी हा लक्झरी ज्वेलरी ब्रँड जार ज्वेल्सचा संचालक देखील आहे. त्यांची एकूण एकूण संपत्ती १६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
ईशा देओलची एकूण संपत्ती किती आहे
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओलने २००२ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचे ‘धूम’ आणि ‘नो एंट्री’ हे चित्रपट यशस्वी झाले पण तरीही ईशाची कारकीर्द फारशी भरभराटीला आली नाही. त्यानंतर तिने भरत तख्तानीबरोबर लग्न केल्यानंतर ब्रेक घेतला पण तिने ‘केकवॉक’ या लघुपटातून आणि २०१२ मध्ये ‘रोडीज एक्स२’ मध्ये गँग लीडर म्हणून पुनरागमन केले. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा देओलची एकूण संपत्ती ५० ते १०० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. भरत तख्तानीपेक्षा ईशा देओलची संपत्ती कमी आहे.