सध्या ट्विटवर सेलिब्रिटींना निशाणा करून त्यांच्यावर विनोदी ट्विट्स करण्याचा नवा ट्रेण्ड सुरु झाला आहे. त्यामुळे जास्त चर्चेत नसणारे सेलिब्रिटी कारण नसतानाही ट्विटर ट्रेण्डमध्ये असतात. आलोकनाथ हे बाबूजी का आशीर्वाद म्हणून, कैलाश खेर हा त्याच्या उंचीमुळे तर, नील नितीन मुकेश त्याच्या पहिल्या तीन नावांमुळे ट्विटर ट्रेण्डमध्ये होता. यात रजनीकांत यांना कसे विसरुन चालेल. रजनीकांत तर त्यांच्या नावामुळेच ट्रेण्डमध्ये असतात.
आजच्या ट्विटर ट्रेण्डमध्ये आहेत, गायिका उषा उथ्थप. त्या डोक्यावर लावत असलेल्या अवाढव्य टिकलीमुळे त्यांच्यावर विनोदी ट्विट केले जात आहेत. त्यापैकी काही ट्विटसः  

कपिल शर्मा ट्विट
वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देण्यासाठी उषा उथ्थप त्यांची टिकली वापरत असतील.

गोठम३
उषा उथ्थप यांच्या लाल टिकली कृपया विनोद करू नका. नाहीतर जपान त्यांच्या राष्ट्रध्वजाकरिता त्याचा वापर करतील.

 

 

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.