दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने तेलुगू भाषिक लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिच्याविरोधात तक्रारी आल्यानंतर तिला अटक करून रविवारी चेन्नई येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. कस्तुरीला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

चेन्नई पोलिसांच्या एका टीमने १६ नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये तिला अटक केली. तिचा अटकपूर्व जामीन मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने फेटाळला. त्यानंतर ती चेन्नईतील तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. तसेच तिने मोबाईल फोनदेखील बंद केला होता.

हेही वाचा – असित मोदी यांची कॉलर धरली अन्…; दिलीप जोशी यांचं ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी कडाक्याचं भांडण

कस्तुरीने तिच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाल्यावर माफी मागितली होती. पण त्याचदरम्यान तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. चेन्नई पोलिसांच्या पथकाने हैदराबादमधील एका चित्रपट निर्मात्याच्या घरातून तिला अटक केली आणि तिची तुरुंगात रवानगी केली. तिथून तिला चेन्नईला आणलं. एग्मोर येथील दंडाधिकारी न्यायालयात तिला हजर करण्यात आलं. तिला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर तिची रवानगी पुझल येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कस्तुरी शंकर काय म्हणाली होती?

‘भारतीय’ आणि ‘अन्नमय्या’ सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयासाठी ओळखली जाणारी ५० वर्षीय कस्तुरी हिने तेलुगू लोकांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. तेलुगू समाज हा प्राचीन काळी राजांच्या पदरी असणाऱ्या स्त्रियांचे वंशज आहेत असे उद्गार कस्तुरीने काढले होते. तामिळनाडूत एका जाहीर कार्यक्रमात बोलताना कस्तुरीने केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटलं.