बॉलिवूडचा किंग खान म्हणून अभिनेता शाहरुख खानला ओळखले जाते. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा टीझर नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनपदार्पण करत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नुकतंच शाहरुखने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी बातचीत केली.

शाहरुखने ट्विटरवर AskSRK द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी पठाण चित्रपटासह अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान शाहरुखच्या एक चाहत्याने त्याला अभिनेता आमिर खानबद्दल एक हटके प्रश्न विचारला. ज्यावर शाहरुखनेही फार मजेशीर उत्तर दिले. सध्या शाहरुखच्या या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

यावेळी शाहरुखच्या एक चाहत्याने विचारले, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट पाहिलास का? यावर उत्तर देताना शाहरुख म्हणाला, अरे आमिर म्हणाला की त्याआधी मला पठाण चित्रपट दाखव. शाहरुखचे हे उत्तर ऐकून तो चाहता हसायला लागला.

यानंतर एकाने विचारले की, पठाण चित्रपट तुझ्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असे तुम्हाला वाटते का? त्यावर शाहरुखने फार हटके उत्तर दिले. थोडं तुम्ही समजून घ्या. थोडं मी समजून घेईन. त्यामुळे नक्कीच तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे शाहरुख यावेळी म्हणाला.

यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानचा पठाण चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.