चाहत्यांची आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करायची तयारी असते. कधी त्यांच्या वाढदिवसाला केक पाठवतात तर कधी त्यांच्यासारखीच केशभूषा करतात. पण ब्रिटनी स्पिअर्सचा असाही एक चाहता आहे जो त्याच्या आवडत्या गायिकेसारखे दिसण्यासाठी काहीही करायला तयार आहे. ब्रायन रे नावाच्या एका चाहत्याने ब्रिटनी स्पीयर्ससारखे दिसण्यासाठी तब्बल ९० वेळा प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. या सर्जरीसाठी तिने तब्बल ८० हजार डॉलर आतापर्यंक खर्च केले आहेत.

[jwplayer 15CH1rTD]

‘एसेशोबीद डॉट कॉम’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मेक मी हे गाणे गाणाऱ्या ब्रिटनी स्पीअर्ससाठी तिचा चाहता एवढा वेडा आहे की त्याने ब्रिटनीसारखे दिसावे यासाठी ९० वेळा ऑपरेशन करुन घेतले. यात नाक, जाडेपणा कमी करण्यासाठी इंजेक्शन घेतली तसेच अंगावरचे केस घालवण्यसाठी लेझर प्रक्रीयाही करुन घेतली. ओठांच्या आणि बुटॉक्सच्या इंजेक्शनसाठी सुमारे ८०,००० डॉलर खर्च केले. याशिवाय त्वचेसाठीही प्रत्येक महिन्याला महागडे क्रीम आणि लोशनसाठी सुमारे ५०० डॉलर खर्च करतो.

https://www.instagram.com/p/BPoyCG-AK9p/

आपल्या या वेड्या प्रेमाबद्दल सांगताना रे म्हणतो की, ‘जेव्हा मी फार लहान होतो तेव्हा मला वाटायचं की मी तिच्यासारखाच दिसतो. मला तिचे एवढे वेड होते की मी तिच्या सगळ्य मुलाखती बघायचो. ती ज्यापद्धतीने नृत्य करते तेही शिकून घेतले आणि तिच्यासारखे हसू मिळवण्यासाठी सर्जरीही केली.’

britney-spears-5th

 

britney-spears-4th

britney-spears-3rd

britney-spears-2nd

britney-spears-1st

[jwplayer BJVTtSeJ]