कित्येक चित्रपट रसिकांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ही सध्या चांगलीच चर्चेत असते. फिल्मी करियरमधून मोठा ब्रेक घेतल्यावर माधुरीने पुन्हा चित्रपटसृष्टीत जम बसवला आहे. सध्या ती चित्रपट, वेबसीरिज, टेलिव्हिजन अशा तिन्ही ठिकाणी झळकत आहे. याबरोबरच ती सोशल मीडियावरसुद्धा चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटोज ही चांगलेच व्हायरल होत असतात.

आत्ताही माधुरीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओमध्ये माधुरीच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यापेक्षा तिच्यावर लोकं टीका करत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीचा चेहेरा काहीसा वेगळा दिसत असल्याने लोक तिला थेट ‘सर्जरी केली का?’ असा प्रश्न कॉमेंटमध्ये विचारत आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : चित्रपटांचं अर्थकारण, कोटींचं बजेट आणि कमाईच्या आकड्यांमागील तथ्य जाणून घ्या

तब्बल ५ वर्षांनी ‘झलक दीखला जा’ या कार्यक्रमाचा १० वा सीझन येत आहे. माधुरी या डान्स रीयालिटि शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे. याच कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान माधुरी मीडियासमोर आली. तेव्हाचा हा तिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लाल रंगाच्या पोलका डॉट साडीमध्ये माधुरी फारच सुरेख दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यात थोडा फरक जाणवल्याने चाहत्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी तिच्या ओठाच्या आकारावरून कॉमेंट केली आहे तर काहींनी थेट “Botox केलं का?” असा प्रश्न विचारला आहे. चाहत्यांच्या या कॉमेंटवरुन असा अंदाज लावला जातोय की माधुरीने सर्जरी केली आहे. काही चाहते माधुरीच्या बाजूनेही बोलत आहे. “ही सर्जरी नसून मेकअप जास्त झाला आहे.” असं म्हणत काही चाहत्यांनी माधुरीची बाजू सांभाळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरी नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘फेम गेम’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तिच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. आता ‘मजा मा’ नावाच्या एका चित्रपटातून माधुरी पुन्हा ओटीटीवर झळकणार आहे. शिवाय संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरमंडी’ या वेबसीरिजमध्येदेखील माधुरी दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.