काही दिवसांपूर्वीच करोना प्रतिबंधक लसींच्या किमतीत वाढ करण्यात आली. त्यावर अभिनेता फरहान अख्तरने ट्विट केलं होतं. यात त्याने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या लस उत्पादक संस्थेला सवाल केला होता.

त्याच्या या ट्विटवरुनच तो ट्रोल होऊ लागला होता. सोमवारी फरहानने एक बातमी शेअर केली होती. भारत सरकार १मेपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुलं करणार असल्याने सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना लसीचे दर कमी करायला सांगितल्याची ती बातमी होती. त्यावर फरहानने ट्रोलर्सला उद्देशून एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “पाहा ट्रोलर्स, सरकार लसीची किंमतही कमी करायला सांगत आहे. आशा करतो की तुम्ही अर्थव्यवस्थेवरचे जे धडे मला देत होता ते त्यांनाही द्याल. तोवर मास्क वापरा, घरात राहा, तोंड धुवत राहा…मला म्हणायचंय हात!”

त्यावर ट्रोलर्सनेही त्याला उत्तर दिलं आहे. एक युजर म्हणतो, तुझ्यासाठीच करत आहेत नाहीतर करोना पसरेल. त्यावर फरहान त्याला म्हणतो, “पत्ता दे तुझा…जोकचं नवं पुस्तक पाठवतो”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरहानच्या ट्विटवर अनेकांनी सहमती दर्शवणारे ट्विट्स केले आहेत. कंगना रणौतने फरहानच्या या ट्विटला रिप्लाय देत लिहिलं होतं, “इतर देश आपल्याला लसीसाठीचा कच्चा माल पुरवत आहेत. कोणत्या किमतीला ते आपल्याकडून खरेदी करतात आणि कोणत्या किमतीला विकतात हे त्यांची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येच्या गुणोत्तराशी समांतर आहे. फेक प्रोपगंडाच्या नादात आपण खूप लसी वाया घालवल्या आहेत आणि आता अमेरिकेने आपल्याला लसी पुरवणं बंद केलं आहे”.
लवकरच फरहान ‘तुफान’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट २१मेला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.