बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मुलांना दत्तक घेतले आहे. अनेक तान्ह्या जीवांना बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकारांनी आपलेसे केले आहे. अगदी आईप्रमाणे त्यांनी या मुलांची काळजी घेतली आहे. उद्या, १६ जूनला फादर्स डे आहे. यानिमित्त जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्यांविषयी ज्यांनी मुलांना दत्तक घेऊन त्यांना लाडाने वाढवले आहे.

सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तीला चार मुलं आहेत. पण, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्यांची धाकटी मुलगी त्यांना बेवारस अवस्थेत सापडली होती. तिचा आवाज ऐकून त्यांचे मन भरून आले आणि त्यांनी तिला घरी आणले.

मिथुन चक्रवर्ती

 

बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता आज सगळ्यांनाच ठाऊक आहे. सलमानची ही लाडकी बहीण खरंतर सलीम खान यांची मुलगी नसून त्यांनी तिला दत्तक घेतले आहे. सलमानची बहीण अलवीरापेक्षा अर्पिताच त्याच्यासोबत जास्त दिसते.

सलमान खान, अर्पिता

 

‘कुछ-कुछ होता है’, ‘कल हो ना हो’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी त्यांची मुलगी ‘काया’ला दत्तक घेतले आहे.

निखिल अडवाणी

 

सुप्रसिद्ध नृत्यप्रशिक्षक संदीप सोपारकरने २००७ मध्ये ‘अर्जुन’ नाकाच्या मुलाला दत्तक घेतले होते. तेव्हा त्याचे लग्नही झालेले नव्हते. नंतर त्यांनी जेसी रंधावाशी लग्न केले.

संदीप सोपारकर

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांची मुलगी ‘मेघना’ला दत्तक घेतले होते. शिक्षणासाठी त्यांनी तिला लंडनलाही पाठवले होते. आता राहुल पुरीसोबत तिचा विवाह झाला आहे.

सुभाष घई ,मेघना

 

‘खोसला का घोंसला’ आणि ‘बॉम्बे टॉकीज’ चित्रपटाचे दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी व त्यांची पत्नी रिचा यांनी मुंबईतील एका अनाथाश्रमातून ‘इरा’ नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

दिवाकर बॅनर्जी

 

दिग्दर्शक कुणाल कोहली यांनीसुद्धा ‘राधा’ नावाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

कुणाल कोहली