लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल. ती ‘बिग बॉस १५’ ची विजेतीही ठरली. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. तेजस्वी तिच्या अप्रतिम सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मराठी रुपेरी पडदयावर आपली छाप पाडायला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता नुकताच आगामी ‘मन कस्तुरी रे’ या चित्रपटातील तेजस्वीचा ‘फर्स्ट लूक’ रिलीज झाला आहे.

हेही वाचा : “संपूर्ण ब्रिटिश म्युझियमच…”; रविना टंडनने घेतली कोहिनूर हिऱ्याच्या वादात उडी

तिने नुकताच सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यातून तिचा बबली आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘श्रुती’ असं तिच्या चित्रपटातील भूमिकेचं नाव आहे. या व्हिडीओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या व्हिडीओमधील तिचा चुलबुला आणि रॉकिंग अंदाज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

या चित्रपटात तेजस्वी सोबत अभिनेता अभिनय बेर्डे झळकणार आहे. या दोघांची ‘लव्हेबल केमिस्ट्री’ आपल्या चाहत्यांची मने जिंकायला सज्ज झाली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन संकेत माने यांचे आहे. नितीन केणी यांच्या ‘मुंबई मुव्ही स्टुडिओ’ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आणखी वाचा : ‘लायगर’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन.. जाणून घ्या कोणी आकारले किती कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्या पोस्टरमध्ये तेजस्वी आणि अभिनय यांची झलक पाहायला मिळाली होती. आता त्यानंतर तेजस्वीचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या फॅन्सच्या मनात असलेली या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढलेली दिसत आहे.