dilip-thakur-loksattaराज कपूर म्हणजे ‘इंद्रधनुष्य’ व्यक्तिमत्व! अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, संकलक तर झालेच, पण मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि प्रेमदृश्यातील धिटाई अशी दोन टोके सारख्याच समर्थपणे साकारणारा अस्सल फिल्मवाला.
आर. के.ची होळी, आर. के.च्या मिनी प्रिव्ह्यू थिएटरमधला आम्हा समिक्षकांसाठीचा चित्रपटाचा खेळ, राज कपूरची पार्टी, आर. के. चित्रपटाबाबत उलट-सुलट भरभरून चर्चा अशा प्रत्येक गोष्टीची आपली संस्कृती आहे. लय आहे. किस्से आहेत. गोष्टी आहेत. दंतकथादेखील आहेत. या सगळ्याचे मिळून राज कपूर भोवती विणले गेलेले वलय त्याच्यासोबत कायम राहिले.
अगदी या छायाचित्रातही ते दिसतय. बी. अनंतस्वामी निर्मित आणि महेश कौल दिग्दर्शित ‘सपनों का सौदागर’च्या यशाच्या पार्टीतील हा नाजुक क्षण. हेमा मालिनी या आपल्या पहिल्याच चित्रपटात रसिकांना आवडली. ‘ड्रीम गर्ल’ अशी उपाधी देतच तिला पडद्यावर आणले. तिचा नायक म्हणून राज कपूर कितपत शोभला या चर्चेवर त्याच्या प्रेमळ अभिनयाने मात केली.
पार्टीत मात्र त्याच्या खास ‘शोमन’ लौकिकास वावरतानाचा हा गोड क्षण. एकाच वेळी हेमा मालिनी आणि बिंदू यांचा छान सहवास आणि त्यांच्या शुभ हस्ते मद्याची चव… राज कपूरच्या अनेकानेक वैशिष्ट्यांना हे शोभते. चित्रपटाच्या जगात प्रतिमेनुसार काही गोष्टी वाट्याला येतात त्या या अशा.
दिलीप ठाकूर

Story img Loader