scorecardresearch

फ्लॅशबॅक : नायिका बदलायचा खेळ…

अगदी मुहूर्ताच्या वेळचाच काय, पण दोन-चार रिळांचे चित्रीकरण झालेल्या चित्रपटातीलही कलाकार काही कारणास्तव बदलला जातो हा देखील चित्रपटसृष्टीचा रंग…

kimi katkar

dilip thakurअगदी मुहूर्ताच्या वेळचाच काय, पण दोन-चार रिळांचे चित्रीकरण झालेल्या चित्रपटातीलही कलाकार काही कारणास्तव बदलला जातो हा देखील चित्रपटसृष्टीचा रंग… दिग्दर्शक हॅरी बावेजा याच्या ‘त्रिनेत्र’ या चित्रपटाची नायिका बदलली गेली हा खेळ तर केवळ रंजक. त्यातील मिथुन चक्रवर्तीची नायिका म्हणून किमी काटकरची निवड झाली. ती गाण्याच्या ध्वनिमुद्रणाला हजर राहिली. त्यानिमित्तच्या पार्टीतही लक्षवेधी ठरली. दरम्यान तिने शंतनु शेवरे याच्याशी लग्नाचे निश्चित करताच चित्रपटसृष्टी सोडायचेही ठरवले. तात्पर्य, ‘त्रिनेत्र’ ही तिने सोडला. आता या ग्लॅमरस आणि बोल्ड भूमिकेसाठी योग्य कोण? मिथुन चक्रवर्तीने वर्षा उसगावकरचे नाव सुचवले. निवड अगदी योग्य असली तरी कधी कधी पटकथेची गरज म्हणून साकारलेल्या पाश्चात्य रुपाच्या भूमिका काही काही वेळा उलटसुलट चर्चेच्या होतात. याचे सामाजिक भान असल्याने वर्षाने हा चित्रपट नाकारला. पण कोणीतरी ‘नायिका’ निवडायला हवी ना? शिल्पा शिरोडकर त्या दिवसात मोहक आणि आकर्षक रुपात सहजतेने पडदाभर वावरते अशा गोष्टीने ओळखली जाई. अशा शोभेच्या भूमिका साकारण्यासाठी सौंदर्यासह मानसिक ताकत आणि तयारीही लागते. त्या दिखाऊ भूमिका म्हणूनच ओळखल्या जातात हे त्या कलाकाराचे दुर्देव म्हणा अथवा प्रथा! शिल्पाने ‘त्रिनेत्र’ मध्ये आकर्षकपणे चित्रपटाच्या मनोरंजनात भर घातली. किमी काटकरची कसर तिने भरून काढली हे काही कमी महत्वाचे नाही. हेदेखील उल्लेखनीय आहे.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2016 at 01:05 IST

संबंधित बातम्या