‘या’ कारणासाठी समांथाने नागर्जुनासाठी केलेली ट्वीट केलं डिलिट

समांथाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले होते.

nag arjuna
(Photo-Instagram)

गेल्या अनेक दिवसांपासून तेलगू अभिनेत्री समांथा अक्किनेनी तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यासाठी बरीच चर्चेत आहे. समांथा आणि तिचा पती नाग चैतन्यमध्ये वाद सुरू असून ते आता एकत्र राहात नाहीत अशा चर्चा रंगत आहेत. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच समांथाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये तिने नागार्जुनला मामा असे म्हटले होते. तेलुगूमध्ये मामा म्हणजे सासरे

अभिनेता नागर्जुनने वडीलांच्या जयंती निमीत्ताने ट्विट एक व्हिडीओ ट्विट केला. या व्हिडीओवर त्याची सून समांथाने कमेंट करत लिहिलं, “हे खूप सुंदर आहे नागर्जुन मामा.” पिंकविल्लाच्या वृत्तानुसार, समांथाने आधी ‘मामा’ या शब्दाशिवाय हे ट्विट शेअर केले होते. मात्र ते लक्षात येताच डिलिट केले.

पती नाग चैतन्य आक्किनासोबत विभक्त होण्याच्या अफवांमध्ये समांथा नागर्जुनला ‘मामा’ संबोधत आहे. गेल्या काही आठवड्यांपासुन त्यांच्यात काही ठीक नसल्याच्या चर्चा रंगत आहेत. जुलै महिन्यात समांथाने तिच्या सोशल मीडियावरली नाव बदलून ‘एस’ असं केले आहे. त्यामुळे अक्किनेनी कुटुंबाशी तिचे संबंध ठीक नसल्याच्या चर्चा रंगत आहेत. दरम्यान समांथाला नुकतच तिरुमाला मंदिराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी समांथाला तिच्या आणि नागा चैतन्याच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताच समांथा काहीशी चिडलेली दिसली आणि तिने त्या रिपोर्टला तेलगूत उत्तर दिलं. “इथे मंदिरात आले आहे. तुम्हाला थोडी देखील अक्कल नाही का?” असं समांथा म्हणाली.

समांथा आणि नागा चैतन्यामध्ये बिनसल्याच्या चर्चा रंगत असल्या तर अद्याप दोघांनी यावर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१४ सालामध्ये आलेल्या ‘ऑटोनागर सूर्या’ या सिनेमाच्या शूटिंगवेळी नागा चैतन्य आणि समांथाची ओळख झाली होती. तर २०१७ सालामध्ये दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधली होती. तेलगू सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणनू समांथा आणि नागा चैतन्याची जोडी लोकप्रिय होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात दरी निर्माण झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: For this reason samantha akkineni deletes tweet for nagarjuna and again repost its aad

ताज्या बातम्या