सध्या अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळते. त्यांचा विवाह सोहळा राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात पार पडणार आहे. आज विकी आणि कतरिनाचे कुटुंबीय राजस्थानसाठी रवाना झाले आहेत. ते सिक्स सेंस फोर्ट बरवाडा हॉटेलमध्ये राहणार आहेत. सध्या तेथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना यांच्या लग्नात हजेरी लावणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यासाठी मुंबईहून काही भांडी मागावण्यात आली आहेत. जवळपास ३०० भांड्यांचे सेट मुंबईहून जयपूरला नेण्यात येणार आहेत.
आणखी वाचा : ‘मॅडम पँट घालायला विसरलात का?, हनिमून फोटोवरुन मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

दरम्यान, परदेशातून आणि भारतातील काही शहरांमधून लग्नातील जेवणासाठी भाज्या मागवण्यात आल्या आहेत. थायलंडवरुन देखील काही भाज्या मागवण्यात आल्या आहेत. कर्नाटक येथून लाल केळी आणि मशरुम मागवण्यात आले आहेत. पालक आणि कोबी या भाज्या देखील कर्नाटक येथून येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्याचे म्हटले जात आहे.