अभिनेत्रीबरोबर काम देण्याच्या बहाण्याने एका मुलीच्या पालकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हैदराबाद येथील सायबराबाद पोलिसांनी याप्रकरणी एक अभिनेता आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. अपूर्व दावडा उर्फ ​​अरमान अर्जुन कपूर उर्फ ​​डॉ. अमित आणि २६ वर्षीय नताशा कपूर उर्फ ​​नाझीश मेमन उर्फ ​​मेघना अशी आरोपींची नावं आहेत.

दावडा व नताशा या दोघांनी बालकलाकाराच्या पालकांची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दोन्ही आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याशिवाय त्याच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल आहेत. बालकलाकाराला काम देण्याच्या बहाण्याने या दोघांनी मुलीच्या आई-वडिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.

“मुलगीच हवी होती मला, एक अशी…” सोनाली कुलकर्णीने बालिका दिनानिमित्त लेकीसाठी केली खास पोस्ट

पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी सांगितले की, आरोपीने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये मुलीला रश्मिका मंदानासह इंडस्ट्रीतील आघाडीचे कलाकार आणि क्रिकेटपटूंबरोबर भूमिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि लाखो रुपये तिच्या पालकाकडून घेतले.

तक्रारदाराने म्हटलं आहे की, ते आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एका मॉलमध्ये गेले होते, तिथं एका मॉडेलिंग एजन्सीने त्यांच्याशी संपर्क साधला. मुलीला रॅम्प वॉक करायला लावला आणि नंतर अंतिम फेरीसाठी रॅम्प वॉक होईल असं सांगितलं. त्यासाठी ३.२५ लाख रुपये जमा करण्यास सांगितलं. ते पैसे परत मिळतील, असं सांगितल्यानं आपण पैसे भरले. त्यानंतर सहा दिवसांच्या फोटोशूटसाठी एकूण १४ लाख १२ हजारांची मागणी करण्यात आली होती. रश्मिका मंदानाबरोबर एका बिस्किट कंपनीच्या जाहिरातीचे शूट होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आपण आरोपींना १४ लाख रुपये दिल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं.

तब्बल सव्वा वर्षाच्या मेहनतीनंतर तयार झाला अथिया शेट्टीचा लग्नातील लेहेंगा; सब्यसाची नाही तर ‘या’ डिझायनरने घेतली मेहनत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय पोलिसांनी चार आयफोन आणि एक अॅपल लॅपटॉपही जप्त केला आहे. आरोपीने ‘ओम’ आणि ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.