Gauahar Khan Weight Loss Transformation : प्रेग्नन्सीच्या काळात अनेक अभिनेत्री मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतात. याशिवाय बाळाच्या जन्मानंतर अनेक अभिनेत्रींचं वजनही वाढलेलं दिसतं, त्यामुळे अभिनेत्रींना मनोरंजन विश्व सोडावंही लागतं.
प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं वजन अभिनेत्रींच्या करिअरसाठी मोठा अडथळा ठरतो. अशातच अभिनेत्री गौहर खानने प्रेग्नन्सीनंतर वाढलेलं वजन कसं कमी केलं, याबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री गौहर खानने मे २०२३ मध्ये तिचा पहिला मुलगा जेहानला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनीच ती ‘झलक दिखला जा सीझन ११’ च्या सेटवर परतली होती.
अलीकडेच ‘द देबिना बॅनर्जी शो’मध्ये झालेल्या संभाषणात गौहरने सांगितले की, तिच्या मुलाच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी तिने फक्त सॅलेड आणि सूपचा डाएट घेतला आणि १० दिवसांत १० किलो वजन कमी केले, कारण तिला लवकरच कामावर परतायचे होते आणि पडद्यावर तिचे सर्वोत्तम द्यायचे होते.
वजन कसं कमी केलं?
देबिना बॅनर्जी शोमध्ये बोलताना ती म्हणाली, “मला माहीत होते की मी पुन्हा पडद्यावर येणार आहे आणि मी ते हलक्यात घेऊ शकत नव्हते. मी सहा महिने स्तनपान केले, पण पूर्णपणे नाही, मी फॉर्म्युला मिल्कदेखील वापरला. पण, त्या सहा महिन्यांत मी काय खाते याची फारशी काळजी घेतली नाही, कारण मी स्तनपान करत होते आणि ती जबाबदारी माझ्यावर होती. मी सामान्य अन्न खाल्ले, जेहानसाठी आवश्यक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रथिने मिळतील याची खात्री केली.”
गौहरने खुलासा केला की, जेहानच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी तिने त्याला ब्रेस्टफीड थांबवण्याचा निर्णय घेतला आणि वजन लवकर कमी करण्यासाठी तिच्या आहारात मोठा बदल केला. ती म्हणाली, “त्याच्या जन्मानंतर सहा महिन्यांनी मी स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवसापासून मी फक्त सॅलेड-डाएट घेतला. माझा डाएट फक्त पाने आणि सूपचा होता. मी माझे तोंड बंद केले. मी डाएटवर नव्हते, मी व्यवस्थित खात होते, पण ते सॅलेड आणि सूपच्या स्वरूपात होते. मी मांसाहार सोडून दिला होता. मी मटण सोडून दिले होते. ते खाण्यासाठी माझे आवडते पदार्थ आहे, परंतु मी ते सोडून दिले कारण त्यात कॅलरीज जास्त आहेत. मी ते सर्व सोडून दिले कारण मला काम करायचे होते.”
२०२३ च्या सुरुवातीला गौहरने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये तिने सांगितले होते की बाळाच्या जन्मानंतर फक्त १० दिवसांनी तिचे १० किलो वजन कमी झाले. तिने लिहिले होते, “१० दिवसांत १० किलो वजन कमी केले. अलहमदुलिल्लाह… अजून ६ किलो वजन कमी करायचे आहे.”