शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्री ‘वर्षा’ हा सरकारी बंगला सोडला व ते त्यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी परतले. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडताना त्यांना निरोप देण्यासाठी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. तर ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’वर पोहोचणाऱ्या उद्धव यांच्या स्वागतासाठीही ‘मातोश्री’बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हे सगळं पाहिल्यानंतर सर्वसामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्यात अभिनेत्री गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचं कौतुक केले आहे.

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

गौहरने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. एकता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता, राज्याची प्रगती याचं उत्तम उदाहरण मांडणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, असं गौहर मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

आणखी वाचा : ‘या’ मराठी चित्रपटात अशोक सराफ आणि जिनिलियासोबत झळकणार सलमान खान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा-विरोध दर्शवत आहेत. आता मराठी अभिनेता जे हिंदुत्ववादी आहेत,सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत अन् गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे समर्थक आहेत असं वाटू लागलंय त्या शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा देणारी एक पोस्ट केलेली आहे,ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.