Gaurav Taneja on Ahmedabad Plan Crash : युट्यूबर गौरव तनेजा फ्लाइंग बीस्ट म्हणूनही ओळखला जातो. गौरवने नुकतंच १२ जूनला अहमदाबाद येथे झालेल्या प्लेन क्रॅशबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. गौरव नेहमी सोशल मीडियामार्फत विमान दुर्घटनेबाबत व्हिडीओ बनवत माहिती देत असतो. यामधून तो त्याचं मतही मांडत असतो. गौरव व्हिसलब्लोअर घोटाळ्यात अडकण्यापूर्वी त्याने १० वर्षे वैमानिक म्हणून काम केलं आहे.

गौरवने एअरलाईन्सवर वैमानिकांवर इंधनाची बचत करण्यासाठी धोकादायक मार्ग निवडून लँडिंग करण्याचा दबाव आणल्याचा आरोप केला आहे. गौरवने २०२० च्या एका व्हिडीओमध्ये या संदर्भातील त्याच्या सर्व तक्रारी मांडल्या होत्या. गौरवने त्याच्या व्हिडीओमधून म्हटलं होतं, “विमान उतरवण्याचे दोन मार्ग आहेत, त्यापैकी एकाचा वापर केल्याने इंधनाची बचत होते आणि इंधन वाचवण्यासाठी एअर एशियाने त्यांच्या वैमानिकांना याच मार्गावरून ९८ टक्के लँडिंग करण्याचे आदेश दिले होते. खरंतर विमानचं वजन, हवा आणि वातावरण यावरून वैमानिकाने ठरवायचं असतं की कोणता मार्ग योग्य आहे आणि वैमानिकांना याचं स्वातंत्र्य असायला हवं”. भारतातील काही विमानतळ इंधन कार्यक्षम लँडिंगसाठी योग्य नाहीत, असंही तो म्हणाला आहे.

गौरव पुढे म्हणाला, “जेव्हा वैमानिक विमान लँड करत असतो तेव्हा त्याच्याकडे दोन कॉन्फिगरेशन असतात (दोन मार्ग). फ्लैप ३ आणि फ्लैप फुल. दोनीहीही तसे सुरक्षित आहेत. एअरबसने दोघांनाही मान्यता दिली आहे. पण, त्यांचा वापर मात्र वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो आणि जर एअरबसला फक्त फ्लैप ३ मधून विमानाची लँडिंग करायची असती तर त्यांनी फ्लैप फुलचा पर्याय ठेवलाच नसता. फ्लैप ३ मुळे इंधन वाचतं, त्यामुळे ९८ टक्के याच मार्गी लँडिंग करायची असं आम्हाला सांगितलं जातं आणि यामुळे वैमानिकावर दबाव येतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरवने अनेक तज्ज्ञांनीदेखील लँडिंगसाठी फ्लैप ३ चा उपयोग करणं घातक असल्याचं सांगितलं आहे. असंही म्हटलं आहे त्याचा उपयोग फक्त लहान विमानतळांसाठी करायचा असतो. इतर ठिकाणी फ्लैप फुल हा पर्याय योग्य मानला जातो, कारण तो सुरक्षित मार्ग असतो. परंतु, यामुळे जास्त प्रमाणात इंधनाचा वापर होतो आणि म्हणून अनेकदा वैमानिकांना लँडिंगसाठी फ्लैप ३ चा मार्ग निवडण्याचे आदेश दिले जातात, असंही पुढे त्याने म्हटलं आहे.