गौतमी पाटील तिच्या डान्समुळे कायम वादात अडकल्याचं पाहायला मिळतं. तिच्या आडनावावरून झालेल्या वादानंतर पुन्हा एकदा तिच्या डान्सवरून वाद झाला होता. छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध झालेल्या घनश्याम दरोडेनं चार दिवसांपूर्वीच गौतमी पाटीलला जाहीर इशारा दिला होता. गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करून मोठं होऊ नये. तसंच तिने तिच्या अदा बदलाव्यात, असं तो म्हणाला होता. त्यावर आता गौतमी पाटीलने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – गौतमी पाटील तुमच्या डोळ्यांत इतकी का खुपतेय?

काय म्हणाला होता घनश्याम दरोडे

“सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार”, अशा शब्दांत घनश्यामनं गौतमी पाटीलला इशारा दिला होता.

“…तर गौतमी पाटील यांना मार खावा लागू शकतो”, छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं दिला इशारा; म्हणाला, “तुमच्या अदा बदला!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलचं घनश्याम दरोडेला उत्तर

“मी घनश्याम दरोडेला इतकंच सांगतेय की दादा सर्वात आधी तर तू माझ्या कार्यक्रमाला ये आणि माझा डान्स बघ. मग माझ्या समोर येऊन माझ्यावर आरोप कर. मला दाखव की मी काय चुकत आहे. तू थेट माझ्यावर आरोप करशील तर मी ऐकून घेणार नाही,” असं गौतमी पाटील घनश्याम दरोडेला म्हणाली.