अभिनेत्री गिरिजा ओक- गोडबोले ही मराठी चित्रीपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गिरिजाने मालिका, चित्रपट आणि त्यासोबतच रंगभूमीही गाजवली आहे. गिरिजा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गिरिजा चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकत्याच एका मुलाखतीत गिरिजाने तिच्या पहिल्या किसचा विचित्र अनुभव सांगितला आहे.

गिरिजाने नुकतीच ‘मिर्ची मराठी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत गिरिजाला तिच्या पहिल्या किसचा किस्सा विचारला तर गिरिजा म्हणाली, मला काही फार आठवत नाही आहे. पण मला एवढं मात्र आठवत की ती फिलींग मला फार काही आवडली नव्हती. मला ते जरा ओके आणि ओव्हररेटेड असल्यासारखं वाटलं होतं. मी लहाण असेल किंवा कॉलेज मध्ये असेल म्हणून मला तसं वाटलं असेल असं गिरिजा म्हणाली. पुढे याविषयी सांगताना म्हणाली, की काही दिवसांनंतर मला जाणवलं की हा क्षण अविस्मरणीय असू शकला असता. तो क्षण ठिक होता कारण पाऊस पडत होता आणि आम्ही दोघे जवळ आलो असं काही झालं नाही. लहाण असल्यापासून मला बिळबिळीत गोष्टी आवडत नाही.

आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरिजा आमिर खान बरोबर ‘तारे जमीन पर’ आणि ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत. गिरिजा वयाच्या १५ व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे.