scorecardresearch

शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral

रोहित शेट्टीने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा ही घटना घडली आहे.

shilpa shetty, rohit shetty,
रोहित शेट्टीने 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा ही घटना घडली आहे.

छोट्या पडद्यावरील इंडियाज गॉट टॅलेंट हा रिअॅलिटीशो लोकप्रिय शोंपैकी एक आहे. या शोमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आपली प्रतिभा दाखवण्यासाठी येतात. या शोमध्ये शिल्पा शेट्टी, किरण खेर, रॅपर बादशाह आणि मनोज मुंतशीर हे परिक्षक आहेत. या शोमध्ये दर आठवड्याला चित्रपटसृष्टीतील अनेक लोक पाहूणे म्हणून हजेरी लावतात. आता शोमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीने हजेरी लावली होती. यावेळी शिल्पाने रोहितला स्टेजवर सगळ्यांसमोर लाथ मारली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हसू अनावर होईल. या व्हिडीओत शिल्पा रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील थंगबलीचा सीन रिक्रेट करताना दिसते. या सीनमध्ये दीपिका आणि शाहरुख दिसले होते. आता या सीनमध्ये आपल्याला शिल्पा आणि रोहित दिसत आहेत.

आणखी वाचा : “अमिताभ समोरच्याला घाबरवतो का?”; किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

शिल्पाने रिक्रिएट केलेला हा सीन खूप फनी दिसत आहे. तिचे एक्सप्रेशन्स हे अप्रतिम आहेत. बादशाह, किरण आणि मनोज यांना हा रीक्रिएट केलेला सीन पाहून हसू आवरत नाही. डायलॉग बोलत असताना शिल्पा रोहित शेट्टीला बेडवरून लाथ मारते आणि त्यानंतर रोहित शाहरुखचा डायलॉग बोलतो, ‘तेरे अप्पा का स्कूटर है क्या जो किक मार रही है… तू डॉन नहीं, गधे की बेटी है…’ सध्या शिल्पा आणि रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shilpa shetty kick rohit shetty on indias got talent set watch the funny video dcp