Girija Oak suffers serious leg injury : मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक. गिरिजा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते. अशातच तिनं नुकतीच शेअर केलेली पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री गिरिजा ओकला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या पायाला ही दुखापत झाली असून, सध्या अभिनेत्री रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्याबद्दलची माहिती तिनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करीत दिली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर रुग्णालयामधील फोटो शेअर करीत तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं आहे.

पायाला गंभीर दुखापत झाल्यानं तिला आता पुढचे काही दिवस आराम करण्यासाठी घरी राहावं लागणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. गिरिजाच्या या पोस्टखाली अभिनेत्री स्पृहा जोशी, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, सुकन्या मोने, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, श्रेया बुगडे या कलाकारांनी कमेंट करीत तिला काळजी घे आणि लवकर बरी हो, असं म्हटलं आहे.

गिरिजाच्या पोस्टखाली अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही कमेंट केली आहे. नुकतीच प्रार्थनाच्या पायालाही गंभीर दुखापत झाली असून, तिच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्याचं तिनं सोशल मीडियावर पोस्ट करीत म्हटलं होतं. आता तिनं गिरिजाच्या पोस्टखाली, “प्लीज काळजी घे. आपण सध्या एकाच त्रासातून जात आहोत”, असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गिरिजाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या रंगभूमीवर तिचं ‘ठकीशी संवाद’ हे प्रायोगिक नाटक सुरू आहे. मार्च महिन्यात पार पडलेल्या ‘झी नाट्य गौरव’ या पुरस्कार सोहळ्यात तिला या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.