Govinda Viral Video : शनिवारी बॉलीवूड स्टार गोविंदाने त्याच्या नवीन लूकमधील एक फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. फोटोमध्ये गोविंदा पातळ मिशा आणि मोठ्या चष्म्यासह दिसत होता.

हा फोटो पाहून चाहते अंदाज लावत होते की, हा अभिनेता एका नवीन चित्रपटात दिसणार आहे. आता हा अभिनेता काही चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

रेडिटवर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो फ्लाइटमध्ये एका लहान मुलीच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेला दिसत आहे. चाहत्यांना त्याची ही शैली अजिबात आवडली नाही आणि त्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली.

Govinda in a flight
byu/DyausPater inBollyBlindsNGossip

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ६१ वर्षीय अभिनेता सेल्फी व्हिडीओ रेकॉर्ड करताना आणि त्याच्या शेजारी बसलेल्या मुलीच्या खांद्यावर टेकताना दिसत आहे. असे वाटत होते की, मुलीला काहीही समजत नव्हते आणि नेटिझन्सना असे वाटले की, तिलादेखील अस्वस्थ वाटत आहे. त्याच वेळी गोविंदा कॅमेऱ्याकडे पाहून हसत होता.

आता चाहते त्यावर “तो काय करत आहे? ती छोटी मुलगी कोण आहे?”, “डरावना नंबर १”, “अरे देवा, हे किती भयानक आहे! उफ्फ”, “तू मर्यादा ओलांडली आहेस” अशा विविध कमेंट्स करीत आहेत. दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली की, याची बायको बरोबर बोलते”. ती मुलगी गोविंदाच्या टीमचा भाग होती की त्याच्या ओळखीची कोणी होती हे स्पष्ट झालेले नाही, की ती सहप्रवासी होती.

शुक्रवारी (२० जून) गोविंदा त्याच्या नवीन लूकमध्ये दिसला आणि त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. काहींना वाटले की, कदाचित हा त्याचा नवीन प्रोजेक्टसाठीचा लूक असेल; परंतु अभिनेत्याने अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही.

शेवटचा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, गोविंदाचा शेवटचा चित्रपट ‘रंगीला राजा’ होता, जो २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, दिगंगना सूर्यवंशी आणि इतरांनीही महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या; परंतु तो बॉक्स ऑफिसवर वाईटरrत्या फ्लॉप ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.