सुधीर- रेवती आयुष्याच्या उत्तरार्धात होतील का एकमेकांचे सोबती?

मनाने एकाकी होत चाललेल्या त्या दोघांची भावनिक कथा..

Varsha Usgaonkar and tushar dalvi
वर्षा उसगावकर, तुषार दळवी

योग्यवेळी आपला जोडीदार निवडून त्याच्यासोबत सुखाचा संसार करणं आणि त्याच जोडीदाराची साथ आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळणं, ही सगळ्यांची इच्छा असते. काही लोक मात्र याला अपवाद ठरतात. मुलाबाळांचं सगळं स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकमेकांसाठी उरलेले ‘ते दोघे’ जर वेगळे झाले तर सगळ्यात जास्त मानसिक त्रास हा स्त्रीला सहन करावा लागतो.

आयुष्याच्या उतरणीला रेवतीही (वर्षा उसगावकर) अचानक अशीच एकटी झाली. आपल्या संसाराचा दुसरा अंक नव्या उमेदीने जगण्याची स्वप्नं पाहणाऱ्या रेवतीचा जोडीदार तिला जन्मभर साथ देण्याचं वचन देऊनही अर्धवट वाटेत सोडून गेला. मुलं विदेशात स्थायिक होऊन त्यांच्या त्यांच्या संसारात रमलेली. एकट्या स्त्रीचं आयुष्य सोपं नसल्याचा अनुभव आता ती पावलोपावली घेत आहे. तिची एकटीची होणारी घालमेल न पाहवून तिची बहीण एका मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवायला सांगते. या वयात घेतलेला हा निर्णय तिच्या मुलांना रुचेल का? या संभ्रमात रेवती असतानाच तिला सुधीर राजवाडे (तुषार दळवी) यांचं स्थळ येतं.

वाचा : बिग बींसाठी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची शूटिंग ठरतेय त्रासदायक?

सुधीर आणि रेवती परस्परांच्या भावना समजून एकमेकांचा स्विकार करतील का? त्यांच्या या निर्णयावर मुलांची काय प्रतिक्रिया असेल? सुधीर आणि रेवतीच्या मनाचे बंध जुळतील का?

मनाने एकाकी होत चाललेल्या त्या दोघांची ही भावनिक गोष्ट झी युवा वाहिनीवरील गुलमोहोर कथामालिकेतील ‘मोगरा फुलला’ या नवीन कथानकात पाहायला मिळणार आहे. २६ व २७ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gulmohar tv serial on zee yuva new story mogra fulala varsha usgaonkar and tushar dalvi

ताज्या बातम्या