दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. अखेर ४ डिसेंबर रोजी हंसिकाने बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्नगाठ बांधली आहे. राजस्थानमध्ये जयपूरच्या एका किल्ल्यात जंगी सोहळ्यात हंसिका आणि सोहेल विवाहबंधनात अडकले. दोघाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोहेल आणि हंसिका दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते.

अभिनेत्री हंसिका मोटवानीला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करणारा सोहेल खातुरिया आहे तरी कोण?

गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मेंहदी आणि संगीत कार्यक्रमात ती खूप सुंदर होती. प्रत्येक फोटोमध्ये ती थाटामाटात लग्न एंजॉ करताना दिसत होती. रविवारी हंसिका आणि सोहेलचं अखेर लग्न झालं असून तिच्या अभिनेत्रीच्या लग्नाचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत.

अभिनेत्री हंसिका मोटवानीने लग्नाच्या या खास दिवसासाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता. तिने त्या लेहेंग्यासोबत मॅचिंग दागिने घातले आहेत. यासोबतच नाकात नथ घालून तिचा ब्रायडल लूक कंप्लीट केला. तर, सोहेलने गोल्डन शेरवानी परिधान केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोहेलने २ नोव्हेंबर रोजी पॅरिसच्या आयफिल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून हंसिकाला प्रपोज केलं होतं. हंसिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करत तिच्या एंगेजमेंटची माहिती दिली होती. माध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार, सोहेल हा मुबईचा असून तो उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि चांगले मित्र आहेत. ते दोघेही बिझनेस पार्टनर आहेत. त्यांनी एकमेकांबरोबर अनेक इव्हेंट केले आहेत. दोघेही एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता लग्न केलं.