अनेक महिन्यांपासून क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याची चर्चा सुरू आहे. टी-२०च्या सामन्यानंतर या चर्चांना आता उधाण आलं आहे. अशातच नताशानं नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीचा संबंध तिच्या आणि हार्दिकच्या नात्याशी केला जात आहे.

नताशानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कठीण परिस्थितीतून जात असताना देवावर कसा विश्वास ठेवावा याबद्दल ती बोलताना दिसतेय. नताशा म्हणाली, “आज मला खरोखर जे ऐकण्याची गरज आहे, असं काहीतरी मी वाचलं आहे आणि म्हणूनच हे बायबल माझ्या कारमध्ये मी माझ्याबरोबर आणलं. कारण- मला तुम्हाला या बायबलमधील काही गोष्टी वाचून दाखवायच्या होत्या.”

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने शेअर केले हनिमूनचे रोमॅंटिक फोटो, पती झहीर इक्बालबरोबर घालवला ‘असा’ वेळ

बायबलमधील ओळी वाचत नताशा म्हणाली, “देव कायम तुमच्याबरोबर असेल. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही, घाबरू नका किंवा निराश होऊ नका. जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून जात असतो तेव्हा आपण निराश होतो, दुःखी होतो आणि अनेकदा विचारात डुंबून गेलेलो असतो. परंतु, तेव्हा देव आपल्याबरोबर असतो. तुम्हाला या परिस्थितीत पाहून त्याला आश्चर्य वाटत नाही. कारण- त्याला आधीच याची कल्पना आहे आणि पुढे काय घडेल याची योजनादेखील त्याच्याजवळ असते.” नताशानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

शनिवारी (२९ जून) पार पडलेल्या टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय संघानं उत्तम कामगिरी करीत विश्वचषक आपल्या नावे केला. या विजयानंतर सर्व स्तरांवर टीम इंडियाचं कौतुक करण्यात आलं. हार्दिक पंड्यानं अखेरच्या षटकात भारतीय संघाला विजय मिळवून दिल्यानं अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं.

हेही वाचा… ठरलं तर मग: तन्वीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ पाहून अर्जुन-सायलीसह सुभेदार कुटुंबाला बसणार धक्का, पाहा प्रोमो

सामन्यानंतर अनेक खेळाडूंनी हा विजय आपल्या कुटुंबासह साजरा केला. रोहित शर्माची पत्नी आणि मुलगी तिथेच हजर असल्यानं दोघांनी मिठी मारून आनंदानं हा क्षण साजरा केला. तर विराटनं पत्नी अनुष्काला व्हिडीओ कॉल करीत ही आनंदाची बातमी दिली. जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनही स्टेडियमवर उपस्थित असल्यानं दोघांनी या विजयाचा आनंद लुटला. परंतु, हार्दिक पंड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक त्याच्या आयपीएलपासूनच्या कोणत्याही सामन्याला उपस्थित नव्हती आणि या विजयानंतर तिनं सोशल मीडियावर हार्दिकसाठी किंवा भारतीय संघासाठी अभिनंदन करणारी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस’ फेम नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पंड्या ३१ मे २०२० रोजी लग्नबंधनात अडकले. त्याच वर्षी त्यांच्या आयुष्यात अगस्त्यचं आगमन झालं. २०२३ मध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही विधींचा समावेश पुन्हा एकदा सात जन्मांचं वचन घेतलं.