दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटूही या कामात मागे नाहीत. या यादीत अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचेही नाव जोडले गेले आहे. हार्दिकने आपल्या आजीसोबत या गाण्याचा व्हिडीओ बनवला आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या या व्हिडीओ अल्लू अर्जुनने कमेंट देखील केली आहे.

हार्दिक पंड्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजीसोबत ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “आमची पुष्पा, ‘आजी'” या आशयाचे कॅप्शन दिले होते. त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : आमंत्रण नसतानाही मद्यधुंद अवस्थेत कपिल शर्मा मध्यरात्री शाहरुखच्या ‘मन्नत’वर पोहोचला अन्…

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
PM narendra modi wears jacket made from plastic bottles and old clothes
VIDEO : “टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या अन् उरलेल्या कपड्यांपासून तयार केले अंगावरील जॅकेट”; पंतप्रधान मोदी यांनी स्वत: सांगितले

हा व्हिडीओ पाहून आता अल्लू अर्जुनने देखील कमेंट केली आहे. ‘खूपच छान.. आजीला माझे खूप सारे प्रेम’ या आशयाची कमेंट अल्लू अर्जुनने केली आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता. सर्वप्रथम रवींद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर रील बनवून या चित्रपटाचा एक सीन शेअर केला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव, सुरेश रैना यांनी श्रीवल्ली या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. डेव्हिड वॉर्नर, ड्वेन ब्राव्हो हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या गाण्यावर भाळले.