तेलुगू चित्रपट ‘पुष्पा’ची जादू संपूर्ण जगात पसरली आहे. चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्यावर सर्वजण व्हिडीओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. भारतीय क्रिकेटपटूही या कामात मागे राहिलेले नाही. आता या यादीत अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचेही नाव जोडले गेले आहे. हार्दिकने आपल्या आजीसोबत या गाण्याचा व्हिडीओ बनवला आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. सर्वप्रथम रवींद्र जडेजाने इंस्टाग्राम रील बनवून या चित्रपटाचा एक सीन शेअर केला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव, सुरेश रैना यांनी श्रीवल्ली या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. डेव्हिड वॉर्नर, ड्वेन ब्राव्हो हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही या गाण्यावर भाळले.
Video: ‘पुष्पा’ गाण्यावरील वॉर्नरचा डान्स पाहून अल्लू अर्जुन म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक पंड्या सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे निवड समिती अद्याप त्याला संधी देण्यास तयार नाही. २०२१च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो खेळला, ज्यावरून वादही झाला होता. आयपीएलच्या या मोसमात तो अहमदाबाद फ्रेंचायझीच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. फ्रेंचायझीने १५ कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.