तब्बल २१ वर्षाने भारताने ‘मिस युनिव्हर्स 2021’चा खिताब जिंकला. भारताची सौंदर्यवती हरनाझ संधू ‘मिस युनिव्हर्स 2021’ या मुकुटाची मानकरी ठरली. यंदा मिस युनिव्हर्स ही स्पर्धा इस्त्रायलमध्ये पार पडली. तिच्या आधी सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी अनुक्रमे १९९४ आणि २००० मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. त्यानतंर तब्बल २१ वर्षाने भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला.
मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवल्यानंतर हरनाझवर भारतासह जगभरातून वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रेटींसह राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे. यानंतर सोशल मीडियावर हरनाझ संधू असा टॅगही ट्रेंड होताना दिसत आहे.
तिच्या या कामगिरीनंतर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिने तिचे विशेष कौतुक केले आहे. लारा दत्ता हिने हरनाझ संधूचे कौतुक केले आहे. यावर ट्वीट करत म्हणाली, अभिनंदन हरनाझ संधू, आमच्या कल्बमध्ये तुझे स्वागत आहे!!! यासाठी आम्ही तब्बल २१ वर्षे वाट पाहिली !!! तुझा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो !!! अब्जावधी स्वप्ने तू सत्यात उतरवलेस. लाराने २००० मध्ये मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावले होते.
हेही वाचा : ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
त्यापाठोपाठ प्रियांका चोप्रा, रविना टंडन, करिना कपूर यांसह विविध अभिनेत्रींनी तिचे कौतुक केले आहे. प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हरनाझचा एक फोटो पोस्ट केला आहे. अभिनंदन हरनाझ संधू. तब्बल २१ वर्षाने मिस युनिव्हर्सचा मुकूट परत घरी आणल्याबद्दल तुझे अभिनंदन, असे प्रियांका म्हणाली.

हेही वाचा : अभिमानास्पद! २१ वर्षांनी भारताने जिंकला Miss Universe 2021 चा ताज, हरनाझ संधू ठरली मानकरी
तर करिना कपूरने तिचे अभिनंदन केले आहे. त्यासोबत बिग बॉसची स्पर्धक हिमांशी खुरानाने तुझा आम्हाला अभिमान वाटतो, असे लिहिले आहे. तर रविनाने फार विलक्षण असे म्हणते तिचे अभिनंदन केले आहे.


कोण आहे हरनाझ संधू?
चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.