हॅरी पॉटर फ्रँचायझीमधील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला डॅनियल रॅडक्लिफ आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन डार्क यांना लवकरच पहिलं आपत्य प्राप्त होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘किल युअर डार्लिंग्ज’च्या सेटवर या जोडप्याची पहिली भेट झाली, ज्यामध्ये डॅनियलने कवी अॅलन गिन्सबर्गची भूमिका केली होती, तर एरिनने त्याच्या प्रेमात पडलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती.

या बातमीला ‘यूएस वीकली’ने दुजोरा दिला आहे. त्यांच्या वृत्तानुसार, एरिनने तिच्या प्रियकरासह बाहेर पडताना तिचं बेबी बंप दाखवलं. तिने मॅचिंग लेगिनसह हुडी घातली होती आणि डॅनियलने हिवाळ्यातील टोपीसह पफर जॅकेट घातले. २०१२ मध्ये ‘किल युअर डार्लिंग्स’चे चित्रीकरण करताना एरिन डार्कची डॅनियल रॅडक्लिफशी भेट झाली. ते गेली बरीच वर्षं एकमेकांबरोबर रहात आहेत.

आणखी वाचा : चित्रपट सुपरहीट होऊनही सुनील शेट्टीने इतर व्यवसाय का सुरू ठेवले? अभिनेत्याने स्पष्ट केलं यामागील कारण

जरी हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल बरीच गुप्तता पाळून असले तरी, त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे आणि ते कायमच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. ‘वियर्ड: द अल यांकोविक स्टोरी’च्या प्रीमियरच्या वेळी एरिनने डॅनियलला पाठिंबा दिला आणि त्याच्यासह त्या कार्यक्रमाला हजेरीही लावली.

View this post on Instagram

A post shared by Daniel Radcliffe (@daniel9340)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल म्हणाला, “मला माझी मुलं हवी आहेत, जर ती असतील तर… त्यांना चित्रपटाच्या सेटच्या आसपास राहिलेली मला आवडेल.” याबरोबरच डॅनियल म्हणाला की त्याच्या मुलांनी चित्रपटाच्या सेटवर क्रूचा भाग व्हावे अशी त्याची इच्छा आहे. प्रसिद्धीबरोबरच त्याच्या संघर्षाबद्दल खुलेपणाने बोलणाऱ्या डॅनियलने हे स्पष्ट केलं की त्याला त्यांच्या मुलांनी फेमच्या आहारी जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे.