Harshvardhan Rane Video : हर्षवर्धन राणे सध्या ओमंग कुमार यांच्या ‘सिला’ या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. आता हर्षवर्धनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

या व्हिडीओमध्ये तो शूटिंगच्या धावपळीतही अभ्यास करताना दिसला. हर्षवर्धन राणे याने त्याच्या आगामी ‘सिला’ चित्रपटाबद्दल इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हर्षवर्धन त्याचा अभ्यास आणि चित्रपटाचे शूटिंग दोन्ही एकाच वेळी करताना दिसत आहे.

हर्षवर्धन राणेची पोस्ट

अभिनेता सध्या श्रीनगरमध्ये त्याच्या नवीन चित्रपट ‘सिला’चे शूटिंग करत आहे. हा व्हिडीओ श्रीनगरमधील प्रसिद्ध दल लेकच्या शिकारा बोटीमध्ये शूट करण्यात आला आहे. हर्षवर्धननं कॅप्शनमध्ये लिहलं, “डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शूटिंगदरम्यान मिळणाऱ्या वेळेचा किंवा गाडीत किंवा श्रीनगरधील दल लेकमध्ये बोटीत असताना मिळणाऱ्या प्रत्येक मिनिटाचा वापर करावा लागेल. ‘दिवानियत’ चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. जर तुम्ही यावेळेस तिकीट खरेदी केलं तर मी कदाचित चांगले गुण मिळवू शकेन”.

‘सिला’ हा चित्रपट ओमंग कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सादिया खतीब मुख्य अभिनेत्री म्हणून आणि ‘बिग बॉस १८’ विजेता करण वीर मेहरा खलनायकाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी हर्षवर्धनने मार्शल आर्ट्स आणि स्टंटचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे.

हर्षवर्धन मानसशास्त्र ऑनर्स पदवी घेत आहे आणि या वर्षाच्या शेवटी त्याची परीक्षा आहे. ‘सिला’ व्यतिरिक्त हर्षवर्धन सोनम बाजवाबरोबर ‘एक दीवाने की दीवानियत’, ‘सनम तेरी कसम २’ मध्ये संजीदा शेख आणि ‘कुन फया कुन’मध्ये दिसणार आहे.

‘एक दिवाने की दिवानियत’ हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हर्षवर्धनचा ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला होता.