‘सनम तेरी कसम’ चित्रपटातून अभिनेता हर्षवर्धन राणे याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अचानक गायब झाला होता. पण आता मोठ्या ब्रेकनंतर अभिनेता हर्षवर्धन राणे पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करतोय. नुकतंच ‘हसीन दिलरुबा’मध्ये झळकलेला हर्षवर्धन आता लवकरच जॉन अब्राहम प्रोड्यूस करत असलेल्या एका चित्रपटात काम करणारेय. पण तुम्हाला माहितेय का, हर्षवर्धन त्याच्या डेब्यूच्या आधी जॉन अब्राहमला एकदा भेटला होता.
अभिनेता हर्षवर्धन राणेचा आगामी चित्रपट जॉन अब्राहम प्रोड्यूस करणार आहे. हर्षवर्धन राणेचं जॉनसोबत खूप वर्षा आधीपासूनच कनेक्शन जुळलं होतं. ‘तैश’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हर्षवर्धन राणे याने स्वतः हा खुलासा केला होता. हर्षवर्धन राणे जेव्हा सुरवातीला कुरिअर बॉयचं काम करत होता, तेव्हा त्याने एकदा जॉन अब्राहमला हेल्मेट डिलिव्हर केलं होतं.
२०२० साली रिलीज झालेल्या ‘तैश’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हर्षवर्धन राणेने हा किस्सा शेअर केला. २००४ साली हर्षवर्धन राणे जॉनला पहिल्यांदा भेटला होता. त्यावेळी हर्षवर्धन राणे कुरिअर बॉयचं काम करत होता. अभिनेता जॉन अब्राहमला हेल्मेट डिलिव्हर करायचं होतं. पण हेल्मेटची डिलिव्हरी करण्याआधी हर्षवर्धनला हे माहिती नव्हतं की तो अभिनेता जॉन अब्राहमला भेटणार आहे. ऑर्डर केलेलं हेल्मेट घेतल्यानंतर जॉनने अगदी प्रेमाने कुरिअर बॉय हर्षवर्धनचे आभार मानले होते. त्यानंतर २०१६ साली हर्षवर्धन राणेने अभिनेता बनून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. आता तो लवकरच जॉन अब्राहमच्याच चित्रपटात झळकणारेय.
हर्षवर्धन राणेने साउथ फिल्मधून आपल्या करिअरला सुरवात केली होती. त्यानंतर त्याने ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हौकेम ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. त्यानंतर हर्षवर्धन खूप कमी चित्रपटातून भेटीला आला. पण आता तो पुन्हा एकदा दमदार एन्ट्री करण्यात तयारीत आहे.