scorecardresearch

“तो अगदी त्याच्या वडीलांसारखा…” अभिनेत्री करीना कपूरने लाडक्या तैमुरबद्दल शेअर केली खास गोष्ट

करीना ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

“तो अगदी त्याच्या वडीलांसारखा…” अभिनेत्री करीना कपूरने लाडक्या तैमुरबद्दल शेअर केली खास गोष्ट
करीना कपूर | kareena kapoor

अभिनेत्री करीना कपूर खान ही नुकतीच आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकली. चित्रपट चांगलाच आपटला. आमिर आणि करीनाने काही वर्षांपूर्वी केलेली वक्तव्यं कारणीभूत ठरली असं काही तज्ञांचं मत आहे. करीना ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे फोटोज ती शेअर करत असते. गरोदर असतानाचेसुद्धा तिचे बरेच फोटो व्हायरल झाले होते. तैमुर पाठोपाठ नुकताच जेहचा जन्म झाला आणि करीना पुन्हा चर्चेत आली. सैफशी केलेलं लग्न असो, मूल झाल्यानंतर असो किंवा त्या मुलांची नावं ठेवण्यावरून असो, करीना कायम चर्चेचा विषय होती आणि तिला सोशल मीडियावर यावरून प्रचंड ट्रोल केलं जातं.

न्यूज १८ च्या एका मुलाखतीमध्ये नुकतंच करीनाने तैमुरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ती म्हणते, “तैमुरलाही त्याच्या वडीलांसारखं व्हायचं आहे. ते दोघे एकत्र पायरेट्स ऑफ कॅरिबियन, स्टार वॉर्स सारखे चित्रपट आणि वेबसीरिज बघतात. तैमुर हा सैफवरच गेला आहे. ते दोघे मिळून नेहमीच मला एकटं पडतात. तैमुरची समज खूप चांगली आहे तसंच त्याचं भवितव्यही उज्वल आहे. जेव्हा त्याला एखादी चुकीची गोष्ट करण्यापासून रोखलं जातं तेव्हा त्याला ती पटकन समजते. तो त्याच्या वयाच्या मानाने फार समजूतदार आहे.”

पुढे करीना म्हणते, “तैमुर आणि जेह दोघेही अत्यंत खोडसर आहेत. अर्थात येणाऱ्या काळात त्यांच्यात आणखीन उत्तम बदल घडतील, यावयातच त्याचं चित्रपटाविषयी असलेली समज उत्तम आहे. वीकएंडला तो त्याचा आवडीचा चित्रपट बघतो, अर्थात तो स्क्रीनसमोर जास्तवेळ बसणार नाही याची मी आणि सैफ काळजी घेतो.”

आणखी वाचा : गोविंदाच्या ‘दुल्हे राजा’ चित्रपटाच्या रिमेकबद्दल मोठा खुलासा; शाहरुख साकारणार मुख्य भूमिका?

करीना ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तैमुरचे आणि तिचे इतर खासगी फोटो शेअर करत असते. ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ आणि करीनाने लग्न केलं, त्यानंतर २०१६ मध्ये तैमुरचा आणि २०२१ मध्ये जेहचा जन्म झाला. करीना नुकतीच आमिरबरोबर चित्रपटात झळकली. याबरोबरच तिच्या पहिल्या ओटीटी प्रोजेक्टचे चित्रीकरणसुद्धा पूर्ण झाले आहे. हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करत असून तो एका जॅपनीज कादंबरीवर बेतलेला आहे. करीनाबरोबर यामध्ये जयदिप अहलावत आणि विजय वर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या