छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवत बॉलिवूड पर्यंत मजल मारणारी अभिनेत्री हिना खान कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. हिना आणि तिचा बॉयफ्रेण्ड रॉकी जैसवाल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हिनाने रॉकीसोबत असलेलं तिचं नात जाहीरपणे कबूल केलंय. अनेकदा रॉकी हिनाच्या कुटुंबियांसोबत देखील वेळ घालवताना दिसतो. त्यांच्या नात्याबद्दल दोघांच्या कटुंबियांना कल्पना आहे. मात्र हिनाने नुकत्याच शेअर केलेल्या एक पोस्टमुळे सध्या चर्चांना उधाण आलं.
हिना खानने नुकतीच तिच्या इन्स्टास्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे हिनाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं असून सोशल मीडियावर हिना ट्रेडिंगमध्ये होती. हिनाने तिच्या इन्स्टास्टोरीला एक फोटो शेअर करत ‘टाइम टू ब्रेकअप’ असं कॅप्शन दिलं होतं. हिनाची ही पोस्ट ट्वीटरवर व्हायरल होत असून अनेक जण तिला ब्रेकअप झालं का? असा सवाल विचारत आहेत.

ट्विटरवर हिनाची ही पोस्ट शेअर करत तिचा एक चाहता म्हणाला, “दुःखी होऊ नकोस हिना खान…तुला असे पाहू शकत नाही…हसत आणि आनंदी रहा, तू ठीक आहेस का?”
तर आणखी एक युजर ट्वीट करत म्हणाला, “अरे देवा, मला हिना खानची चिंता वाटतेय. तिच्या ब्रेकअपवरूनअनेक ट्वीट होत आहेत. नेमकं काय झालंय?”
हिना खानच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केलीय. मात्र प्रत्यक्षात नेमकं काय घडलंय. याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
हिना तिच्या फोटोशूटमुळे तसचं ग्लॅमरस अंदाजामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.