मनोरंजनसृष्टी ही बाहेरून जेवढी भव्य दिसते आतून तीसुद्धा तेवढीच पोखरली गेली आहे. केवळ बॉलिवूडनव्हे तर हॉलिवूडमध्येही यौन शोषणसारख्या गोष्टी अगदी सर्रास घडतात. आत्ता आपल्याइथे साजिद खानच्या ‘मी टू’ची चर्चा आहे, तर हॉलिवूडमध्ये तिथला सुपरस्टार केविन स्पेसी याच्यावर लागलेल्या आरोपांवरुन खलबतं सुरू आहेत. बराच काळ केविन यांच्यावर यौन शोषणासंदर्भात कारवाई सुरू आहे.

नुकतंच मॅनहॅटन फेडरल कोर्टने या मुद्द्यावर सुनावणी केली आणि या प्रकरणात केविन स्पेसी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. अॅंथनी रॅप्प जे आता ५० वर्षाचे आहेत त्यांनी केविनवर यौन शोषण केल्याचे आरोप लावले होते. तेव्हा अॅंथनी केवळ १४ वर्षाचे होते. या आरोपाला उत्तर देताना केविन यांनी हे आरोप फेटाळले आणि त्यांनी रॅप्पला आपण कधीच एकांतात भेटलो नसल्याचंही स्पष्टीकरण दिलं.

आणखी वाचा : रावणाला त्याचे उर्वरित बळी मिळणार का? अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद २’चा टीझर प्रदर्शित

याआधीसुद्धा २००५ ते २०१३ मध्ये केविन यांच्यावर तब्बल ५ वेळा यौन शोषणाचे आरोप झाले होते. यासंदर्भात लंडन येथील न्यायालयात सुनावणीदेखील झाली होती, याबाबतीतही केविन यांनी आपण निर्दोष आहोत हेच स्पष्टीकरण दिलं. एका व्यक्तीने केविनवर ओरल सेक्ससाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप लावला होता. जर यामध्ये केविन दोषी आढळतात तर त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते असं कायदे तज्ञांचं म्हणणं आहे. याबरोबरच २०१६ दरम्यानसुद्धा एका १८ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केविन यांच्यावर लागला होता, पण मुलाने जवाब नोंदवण्यास नकार दिल्याने केविन यांची त्यातून सुटका झाली.

केविन यांच्या कारकिर्दीच्या ६ वर्षांनी त्यांच्यावर हे गंभीर आरोप व्हायला सुरुवात झाली. याचदरम्यान अमेरिकेत ‘मी टू’ मुव्हमेंटने डोकं वरती काढलं आणि स्त्रियांबरोबरच पुरुषही त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल उघडपणे बोलू लागले. सध्या अजूनही काही प्रकरणातून केविन यांची सुटका झाली नसली तरी अॅंथनी रॅप्प प्रकरणात त्यांची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kevin Spacey (@kevinspacey)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केविन यांनी हॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. ‘American Beauty’ आणि ‘The Usual Suspect’ या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळाला आहे. नेटफ्लिक्सच्या ‘हाऊस ऑफ कार्डस’ या वेबसीरिजमध्येही केविन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. नंतर त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप लागले की त्यांना या सीरिजमधून वगळण्यात आलं आणि बघता बघता त्यांची फिल्मी कारकीर्द संपुष्टात आली.