लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली ही नेहमीच तिच्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने चर्चेत येतच असते. पण यंदा तिच्या चर्चेत येण्याचं कारण तिने केलेलं सगळ्यात खतरनाक फोटोशूट आहे. तिचे हे फोटोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे हे फोटोशूट पाहून फॅन्स देखील अवाक झालेत.

खरं तर अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्री चर्चेत राहण्यासाठी काही तरी वेगळं आणि अवघड टास्क घेत हटके फोटोशूट करतंच असतात. परंतू हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हीने चक्क मधमाश्यांसोबत फोटोशूट केलंय. ते ही एक नाही, दोन नाही तर तब्बल १८ मिनीटं मशमाश्यांचा मोहोळ तिच्या शरीरावर चिटकून राहिला होता. आजच्या जागतिक मधमाशी दिनांचं औचित्य साधून तिनं हे खतरनाक फोटोशूट केलंय. हे फोटोशूट तिने नॅशनल जिओग्राफिक या मासिकासाठी केलं होत. तर प्रसिद्ध छायाचित्रकार डॅन विन्टर्स यांनी तिचं फोटोशूट केलंय. या फोटोशूटवेळी हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिनाच्या शरीरावर जवळपास १००० पेक्षा जास्त मधमाशा चिटकल्या होत्या. इतकं मोठं धाडस करत अभिनेत्री अँजेलिनाने केलेल्या फोटोशूटमधील फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटोज लक्ष देऊन पाहिले तर, कित्येक मधमाशा अँजेलिनाच्या कपड्यांवर आहेत. तिचा गळा, खांदे आणि तोंडावरही मधमाश्या पहायला मिळत आहेत. फोटोमध्ये अँजेलिनाने एक ऑफ शोल्डर ब्लॉउज परिधान केला आहे. या मधमाश्या डॅन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाशा आहेत.

या फोटोशूटसाठी मधमाश्या शांत रहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची हानी करू नये, यासाठी विशेष लक्ष दिलं होतं, असं डॅन विन्टर्स यांनी सांगितलं. फोटोशूट दरम्यान मधमाश्यांपासून कोणता धोका निर्माण होऊ नये म्हणूनच आधीच याचं नियोजन करण्यात आलं होतं. नॅशनल जिओग्राफिकने या फोटोशूटचा व्हिडिओ देखील शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अँजेलिनाचं शरीर एखाद्या वस्तूंनी झाकलेले दिसून येत आहे आणि शेकडो मधमाश्या त्यांच्यावर शरीरावर चालत आहेत. काही मधमाश्या तिच्या खांद्यावर तर काही चेहऱ्यावर चालताना आणि गोंधळ करताना दिसून येत आहेत. अँजेलिनाला अगदी हालचाल न करता स्तब्ध उभं रहायचं होतं. या दरम्यान, अँजेलीनाने केवळ आपलं डोकं वर-खाली हलविल्याचं दिसून येतं.

इथे पहा अँजेलीनाचा वीडियो-

या खतरनाक फोटोशूट अशी केली होती तयारी
हा व्हिडीओ शेअर करताना फोटोग्राफर डॅन विन्टर्स यांनी एक कॅप्शन लिहून फोटोशूटसाठी कशी तयारी केली होती, हे सांगितलं. या फोटोशूटसाठी थेट इटलीवरून मधमाश्या मागवल्या होत्या, ज्या फोटोशूटवेळी एकदम शांत राहू शकतात. तसंच अँजेलीना व्यतिरिक्त इतर क्रू-मेंबर्सनी प्रोटेक्टिव्ह किट परिधान केलं होतं. या मधमाश्यांना शांत ठेवण्यासाठी फोटोशूटच्या ठिकाणी शांतता आणि अंधार ठेवावा लागला होता. फेरोमेन या केमिकलकडे मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे त्याचा उपयोग करण्यात आला होता.

अँजेलीनाचं हे हटके फोटोशुट पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तिच्या या फोटोजवर कमेंट्स करत अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतूक तर केलंच आहे. पण काही जणांनी तर खिल्ली उडविणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच लाखोंनी व्हूव्स मिळाले आहेत.