बॉन्ड सिरिज ही अनेकांच्या मनात घर करून गेली आहे. आता बॉन्ड सिरिजचा 25 वा चित्रपट येण्याच्या तयारीत आहे. अशातच सिक्रेट एजंट 007 ची भूमिका सर्वांनाच अचंबित करणारी ठरणार आहे. ही गाजलेली भूमिका यावेळी एक ब्रिटीश अभिनेत्री साकारणार आहे. लशाना लिंच असे या अभिनेत्रीचे नाव असून तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
यापूर्वी लशानाने साकारलेल्या ‘कॅप्टन मार्वल’ या चित्रपटात साकारलेल्या ‘मारिया राम्बेऊ’ या भूमिकेची सर्वच स्तरातून स्तुती करण्यात आली होती. त्यामुळे आता तिच्या बॉन्ड सिरिजमध्ये एजन्ट 007 च्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या इंग्लंड आणि इटली या देशांमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे. दरम्यान, तिने चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.