Soundarya Sharma reacts on casting couch :बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी एक मोठे स्वप्न असते आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाने अशाच एका अभिनेत्रीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आम्ही सौंदर्या शर्माबद्दल बोलत आहोत, जिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. ‘लाल परी’ या गाण्यातील तिचे नृत्य प्रेक्षकांना खूप आवडले. आता सौंदर्या शर्मा चित्रपट आणि कास्टिंग काउचबद्दल बोलली आहे.
सौंदर्या शर्मा कास्टिंग काउचबद्दल काय म्हणाली?
शुभंकर मिश्रा यांच्याशी कास्टिंग काऊचवर झालेल्या संभाषणात सौंदर्या शर्मा म्हणाली, “असे नाहीये, खूप चांगले लोक असतात. निवड तुमची असते. मला वाटते की, प्रत्येक उद्योगात सर्व प्रकारचे लोक असतात. तुम्ही मला सांगा की, कोणत्या उद्योगात कोणत्या प्रकारचे लोक नसतात. पण, जर तुम्हाला कोणाशी हस्तांदोलन करायचे नसेल, तर कोणीही तुमच्याशी हस्तांदोलन करू शकत नाही. समोरची व्यक्ती म्हणेल की, निवड तुमची आहे. तुम्ही कचऱ्याचा डबा नाही आहात की कोणी काहीही तुमच्यावर फेकले आणि तुम्ही ते फेकू दिले. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची नसेल, तर ती करू नका. असे नाही की, मी लोकांना भेटले नाही आणि त्यांनी मला काही सांगितले नाही; पण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे ही माझी नेहमीची सवय आहे. मी काम केले आहे आणि माझे काम आतापर्यंत मर्यादित आहे.”
बॉलीवूडमध्ये येण्यासाठी काय करावे? यावर सौंदर्या म्हणाली, “बॉलीवूडमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असले पाहिजे. दुसरे म्हणजे स्वतःवर विश्वास असला पाहिजे. दुसऱ्याचे ऐकू नये. तिसरे म्हणजे तुमच्या कलाकृतीवर काम करीत राहा. चौथे म्हणजे, तुम्ही अतिआत्मविश्वासू राहू नका. पाचवे म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.”
‘हाऊसफुल ५’सारख्या उच्च प्रतिष्ठित चित्रपटात मुख्य भूमिका मिळणे हे कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे असते. या चित्रपटातील सौंदर्याचे काम पसंत केले जात आहे आणि तिचे कौतुकही होत आहे. सौंदर्याच्या मते, तिने कधीही कल्पना केली नव्हती की, एक दिवस ती या फ्रँचायजीचा भाग होईल. तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तिने या क्षणाला ‘तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पॉइंट, असे म्हटले आहे.
सौंदर्या शर्मा ‘बिग बॉस १६’मध्ये दिसली होती. तेथूनच तिला नाव आणि प्रसिद्धी मिळाली. अक्षय कुमार स्टारर ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंत या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.