अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान यांनी बुधवारी वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात स्वतंत्रपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आपला विवाह संपुष्टात आल्याचे दोघांनीही जाहीर केले होते. घटस्फोटासाठी सादर केलेल्या अर्जात या दोघांनीही परस्परांवर कोणतेही आरोप/प्रत्यारोप केलेले नाहीत. परस्परसंमतीने आपण घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत असल्याचे दोघांनी म्हटले आहे. डिसेंबर २०१३ पासून हे दोघेही वेगवेगळे राहात आहेत. या अर्जावरील सुनावणी आता ऑक्टोबर मध्ये होणार आहे. या दोघांचे लग्न २००० मध्ये झाल़े