आपल्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून एक अज्ञात व्यक्ती चाहत्यांची दिशाभूल करीत आहे. तसेच चित्रपटसृष्टीबाबत वावडय़ा उठवित असल्याची तक्रार अभिनेता हृतिक रोशन यांने शुक्रवारी मुंबई पोलिसांत केली. हा ई-मेल बंद करावा व संबंधितावर कडक कारवाई करावी, असे हृतिकने पोलीस आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. एका अज्ञात व्यक्तीने hroshan@email.com हा ई-मेल आयडी तयार केला असून त्याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची दिशाभूल करण्यात येत आहे, असे हृतिकने पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पाठविलेल्या चार पानी पत्रात म्हटले आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तसेच ई-मेल आयडी तयार करून हृतिकच्या चाहत्यांची दिशाभूल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2014 रोजी प्रकाशित
बनावट ई-मेलबाबत हृतिकची पोलिसांत तक्रार
आपल्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून एक अज्ञात व्यक्ती चाहत्यांची दिशाभूल करीत आहे.

First published on: 13-12-2014 at 05:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan complains to police about fake email account