मेंदूवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अभिनेता ह्रतिक रोशनला गुरुवारी रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले. ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मेंदूला इजा झाल्यामुळे ह्रतिकवर चार दिवसांपूर्वी हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूत रक्ताची गाठ झाल्यामुळे त्याला दोन महिने त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडताना ह्रतिकने आपली तब्येत उत्तम असल्याचे सांगत चाहत्यांना अभिवादन केले. यावेळी वडील राकेश रोशनही त्याच्याबरोबर उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर कमीतकमी चार आठवडे डॉक्टरांनी ह्रतिकला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले असल्यामुळे ‘बँग बँग’चे चित्रिकरणही पुढे ढकलण्यात आले आहे. अभिनेता धर्मेद्र यांनी ह्रतिकच्या तब्येतीची विचारपूस केली. धर्मेद्र यांनी ह्रतिकला यापुढे स्टंट्स करताना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्लाही दिला आहे. तर ह्रतिकचा सर्वात जवळचा मित्र दिग्दर्शक करण जोहर यानेही त्याच्यासाठी आपल्या ‘यह जवानी है दिवानी’ या चित्रपटाची डीव्हीडी भेट दिली आहे. आजवर करणच्या कोणत्याही चित्रपटाचा विशेष खेळ ह्रतिकने चुकवलेला नाही. पण, त्याला ‘यह जवानी है दिवानी’चा खास शो पाहता आला नव्हता. त्यामुळे चार आठवडय़ांच्या या विश्रांतीदरम्यान ह्रतिकला हा चित्रपट पाहता यावा, यासाठी करणने ही भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
हृतिक घरी परतला
मेंदूवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अभिनेता ह्रतिक रोशनला गुरुवारी रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले. ‘बँग बँग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान मेंदूला इजा झाल्यामुळे ह्रतिकवर चार दिवसांपूर्वी हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूत रक्ताची गाठ झाल्यामुळे त्याला दोन महिने त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

First published on: 12-07-2013 at 02:37 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrithik roshan discharged from hospital post brain surgery