scorecardresearch

VIDEO : हातात हात घालून एंट्री केली अन्…; गर्लफ्रेंडला घेऊन पार्टीमध्ये पोहोचला हृतिक रोशन

दिग्दर्शक करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचीच सर्वाधिक चर्चा रंगली. याचं कारण देखील तितकंच खास होतं.

hrithik roshan,saba azad
दिग्दर्शक करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये अभिनेता हृतिक रोशनचीच सर्वाधिक चर्चा रंगली. याचं कारण देखील तितकंच खास होतं.

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. सुझान खानबरोबर अनेक वर्ष संसार केल्यानंतर दोघंही विभक्त झाले. पण आपल्या मुलांसाठी हे दोघं अजूनही एकत्र येतात. रिलेशनशिपमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत असणारा हृतिक आता अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. यापूर्वी हृतिक-सबाला बऱ्याचदा एकत्र पाहण्यात आलं होतं. दोघांचे फोटो, व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. आता तर चक्क हृतिक सबाला घेऊन दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थ पार्टीला पोहोचला होता.

करणने आपला ५०वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी बी-टाऊनमधील सगळीच मंडळी उपस्थित होती. तसेच हृतिक देखील करणला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला. पण यावेळी तो एकटा नव्हता. हृतिक आणि सबा दोघंही यावेळी करणच्या बर्थडे पार्टीला एकत्र आले होते. हातात हात घालून हृतिक-सबा चालत येत असताना उपस्थितांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. त्यांचा यादरम्यानचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – सोनाली कुलकर्णीने सासरी पहिल्यांदाच बनवला गोड पदार्थ, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हृतिक-सबाने कॅमेऱ्यासमोर फोटोसाठी विविध पोझ देखील दिल्या. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला. आता तर या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पार्टीला हृतिकची एक्स पत्नी सुझान खान देखील हजर होती. सुझानने देखील आपल्या प्रियकराबरोबर या पार्टीला येणं पसंत केलं. म्हणजेच हृतिक-सुझानने आपापला जोडीदार निवडला आहे असं म्हणायला हरकत नाही.

आणखी वाचा – VIDEO : “मन्नतमध्ये ११ ते १२ टिव्ही अन् त्याची किंमत…”, शाहरुखचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले हैराण

आणखी वाचा – हद्दच झाली राव! करोडो रुपयांची कार अन् तीन वेळा अपघात, कंगना रणौत म्हणते…

सबा आझाद ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. सबाने २००८ मध्ये ‘दिल कबड्डी’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती राहुल बोससोबत झळकली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. पण अद्यापही हृतिक-सबाने आपल्या नात्याची जाहिर कबुली देणं टाळलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hrithik roshan makes formal public appearance with saba azad at karan party sussanne khan arrives with arslan goni kmd

ताज्या बातम्या